मागील १५ मेपासून शहरातील १० ते १२ नगरांमध्ये पावसाळापूर्व नाले व इतर स्वच्छता मोहिमेची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरील कामे अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नाल्यांतून पाणी अलगदपणे जावे म्हणून मोठ्या नाल्यांची जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई केली जात आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे लवकरात लवकर व योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी टास्क फोर्स टीम तयार करण्यात आली आहे. नेमलेली टास्क फोर्स टीम मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रभारी स्वच्छता निरीक्षक मुंजाजी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या ३६ कामांपैकी २० कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे दोन दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती टास्कफोर्स टीमने दिली.
पावसाळापूर्व कामाला आला वेग...
शहरातील सिद्धार्थनगर, अंबिका टॉकीज परिसर, मोसीकॉल परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, औंढा रोड परिसर, पेन्शनपुरा, नाईकनगर, हरण चौक, गांधी चौक, महावीर चौक, रिसाला परिसर, गाडीपुरा परिसर, आदी छोट्या-मोठ्या नगरांमधील नाल्यांची तसेच इतर स्वच्छता कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणची कामे दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.