हिंगोली : मागील दोन महिन्यांपासुन जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे रिमझीम तर कुठे चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. तर कुठे धो-धो पाऊसही झाला. हिंगोली शहरासह जिल्हाभरात सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. २६ जुलै रोजी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील विविध परिसरात पाऊस झाला. हिंगोली शहरात शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून रिमझीम पाऊस झाला. संध्याकाळी ६ वाजता पावसाचा अचानक जोर वाढला होता.
हिंगोली शहरासह जिल्हयातील सेनगाव, तसेच कनेरगाव नाका, आडगाव रंजे, कळमनुरी, नांदापूर, मन्नास पिंपरी, आखाडा बाळापुर, जवळा बाजार, कौठा, डोंगरकडा आदी ठिकाणी पाऊस झाला. २६ जुलै रोजी सकाळपासून सर्वत्रच ढगाळ वातावरण होते, त्यानंतर पावसाला सुरूवात झाली.