शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

डिजिटल इंडियाचा प्रकल्प करणार पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:58 PM

येथील एका तरूणाने डिजीटल इंडिया चा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. यात त्याने स्वच्छता, वाहतूक कोंडी, जड वाहनांची समस्या, गतिरोधक, अग्निशमन, अपघात सूचना, रेल्वे क्रॉसिंग इ. समस्यांवर आधुनिक उपाय सुचवणारा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा डेमो जिल्हाधिका-यांना दाखवण्यात आला असून, त्यांच्या सूचनेप्रमाणे हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयास सादर करणार असल्याचे नितीन जोगदंड यांनी सांगितले.

चंद्रकांत देवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील एका तरूणाने डिजीटल इंडिया चा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. यात त्याने स्वच्छता, वाहतूक कोंडी, जड वाहनांची समस्या, गतिरोधक, अग्निशमन, अपघात सूचना, रेल्वे क्रॉसिंग इ. समस्यांवर आधुनिक उपाय सुचवणारा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा डेमो जिल्हाधिका-यांना दाखवण्यात आला असून, त्यांच्या सूचनेप्रमाणे हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयास सादर करणार असल्याचे नितीन जोगदंड यांनी सांगितले.वसमत येथील रहिवासी व परभणी येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन जोगदंड याने डिजिटल इंडिया च्या अभियानात सहभाग नोंदवण्यासाठी स्वत:चा प्रकल्प तयार केला आहे. नितीन जोगदंड ने शहरीकरणाच्या वाढत्या समस्या व त्यावरील उपाय डिजीटल पद्धतीने सोडवण्याचे तंत्रज्ञान सादर केले आहे. जड वाहनांचा शहरातील प्रवेश ही समस्या सोडविण्यासाठीची कल्पना त्याने डिजिटल स्वरूपात सादर केली आहे. जडवाहन शहरात प्रवेश करताच स्वंयचलित यंत्राद्वारे जड वाहन हे प्रवेश करण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी, स्वयंचलित यंत्राने वाहनास सुचना व बायपासला जाण्यासाठीची माहिती पुरवण्याचे काम, संबंधित यंत्रणेला सदर वाहनाची माहिती अशी एका क्षणात देण्याची यंत्रणा त्यात समाविष्ट आहे.शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या प्रयत्नात डिजीटलद्वारे उपाय सुचवण्यात आले आहेत.नागरिकांनी कचराकुंडीत कचरा टाकताच नागरिकाचे लगेच अभिनंदन करणारा आॅडिओ जारी होणार, कचराकुंडी भरल्याचे सायरन नगरपालिकेत वाजणार, सदरचा कचरा उचलून नेईपर्यंत सायरन वाजतच राहणार असल्याने कचराकुंड्या तुंबण्याची समस्या सुद्धा राहणार नाही, असे नितीन जोगदंड ने सुचवले आहे. या शिवाय अग्निशामक यंत्रणा, रेल्वे क्रॉसिंगवरील समस्यांवरील उपाय, ट्रॅफिक जामवरील उपाय, गतिरोधक डिजीटल आदी आठ मुख्य समस्यांवरील डिजिटल उपाय दर्शवणारा प्रकल्प तयार केला आहे.प्रकल्पाचा डेमो जिल्हाधिकाºयांना सादर केला. जिल्हाधिकाºयांनी प्रकल्प पाहून नितीनच्या प्रयोगाचे व कल्पनेचे कौतुक केले.हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयास सादर केल्यास त्याची निश्चित दखल घेतली जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. आता नितीन हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयास सादर करण्याची तयारी करत आहे. प्रकल्पास दर्जेदार बनावण्यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी त्याने विविध संस्था व मान्यवरांकडे मदतीची अपेक्षा केली आहे. वसमतसारख्या गावातील तरूणाने थेट डिजिटल इंडियात सहभागासाठी सुरू केलेली धडपड व त्याचा प्रयोग चर्चेचा विषय आहे.