हिंगोली : /आठवड्यापासून /हळदीच्या दरात होत असलेली वाढ उत्पादकांचा पदरात पडत नाही. अद्याप माल हातात आला नसल्याने व्यापार्यांचे चांगभले होत आहे. बुधवारी किमान ६८00 रूपये तर किमान ८0१५ रूपयांचा दर मिळाला. परंतु हंगामात ५ हजारावर असलेली आवक केवळ ७९५ क्विंटलावर होती.
हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी राज्यात प्रसिद्धआहे. सांगलीनंतर येथील बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक असते. सोबत वसमतलाही शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. खरेदीनंतर लगेचच पैसा हातात पडत असल्यामुळे हिंगोलीत खरेदीचे आकडे चढे असतात. अद्याप नवीन हळद शेतकर्यांच्या हाती पडली नाही. तरीही आठवड्यापासून दरवाढ होत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांतील भाव वधारले आहेत. बुधवारी हिंगोलीतील दरांनी आठ हजाराचा आकडा गाठला. सकाळी ६८00 रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ झाली. कमाल दर ८0१५ रूपयांपर्यंत गेला. याहीपेक्षा सांगली बाजारपेठेत किमान ७२00 आणि कमाल १३ हजार ६00 रूपयांचा दर होता. दोन्हीपेक्षा मुंबई बाजार समितीत किमान १0 हजार ८00 होता. कमाल १४ हजार ८00 रूपयांवर गेला. त्याचा फायदा उत्पादकांऐवजी व्यापार्यांना झाला. नवीन हळद काढणीला आली नसल्याने शेतकर्यांच्या हाती माल नाही. महिन्यानंतर माल हातात येण्याची शक्यता आहे. तेव्हा बाजाराचे दर घसरण्याची शक्यता असते. प्रतिवर्षीचे हे चित्र असल्याने वाढलेल्या दराबाबत शेतकर्यांना तितकी आस्था नाही. पुढील महिन्यात अधिक दरांची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. /(प्रतिनिधी)
कळमनुरी हिंगोली
■ बाजारपेठीची उपलब्धता असली तरी जिल्ह्यात हळद लागवड कमी आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने वसमत वगळता चारही तालुक्यात लागवडीखाली क्षेत्र २ हजार हेक्टरही नाही. यंदाच्या दुष्काळामुळे लागवडीत घट झाली. त्यात अत्यल्प पर्जन्यामुळे अपेक्षित उत्पादनाची कमी शक्यता आहे. हिवाळ्यात आलेल्या धुईमुळे हळदीवर रोगांचा हल्ला झाला होता. करप्या रोगही हळदीला मारक ठरला.
■ बाजार समितीत प्रत्येक मालाची आवक कमी आहे. खरीप पीकच हातात पडले नसल्याने रबीचा विषयच नाही. हळदीचीही हीच अवस्था होणार असल्याने हळदीवर प्रक्रिया उद्योगालाही माल मिळण्याची शक्यता कमी आहे.