लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पाच महिन्यानंतरही तपासात ठोस असे काही हाती लागले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास सोपवूनही मारेकरी सापडत नसल्याने या खून प्रकरणाचा उलगडा होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आजेगावपासून दीड किलोमीटर अंतरावरील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर (४०) यांच्यावर ३ जुलै रात्री साडेसातच्या सुमारास मंदिरातच अज्ञातांनी धारधार शस्त्राने वार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपासात अज्ञात मारेकरी एकटाच असल्याचे सिद्ध झाले. मयतासमवेत घटनास्थळी असलेल्या दोघांच्या जबाबानुसार मारेकºयाने महाराजावर केलेल्या हल्ल्यानंतर आरोपी अत्यंत शांंतपणे दुचाकीवर बसून सेनगावच्या दिशेने गेला होता. सुरुवातीला गोरेगाव पोलिसांनी तपास केला. खुनाचा उलगडा होईल अशी ठोस दिशा तपासाला मिळाली नसल्याने ते सपशेल अपयशी ठरले आहेत. खुनाची कारणे, संशयास्पद बाबींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आल्याचे यावरुन दिसते.मयताच्या नातेवाईकांचा जवाब, मोबाईल लोकेशन, रेकॉर्ड डाटा, यासह तपासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक सर्व बाबींची पडताळणी गोरेगाव पोलिसांनी प्रांरभी केली. परंतु त्यातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने आरोपीने यात महत्त्वाचे असे कोणतेही धागदोरे सोडले नसल्याने हा तपास गोरेगाव पोलिसांकडून ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे दिला. त्यांनी अनैतिक संबंध, गुप्तधन आदी कारणे समोर ठेवून तपास केला. परंतु मारेकरी स्पष्ट होईल यापर्यंत तपास अद्यापही पोहचला नाही. अत्यंत निर्घृणपणे पुजाºयाचा खून नेमका कुणी आणि कशासाठी केला? हा प्रश्न पाच महिन्यानंतरही कायम आहे.
पुजारी खून प्रकरण तपास दिशाहीनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:43 PM