शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:33 AM

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात ...

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड झाली आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय रकमेतील मंजुरीची रक्कम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मस्टरद्वारे प्रदान होणार आहे. ही रक्कम वगळता ७० टक्के स्वच्छ भारतकडून, तर ३० टक्के ग्रा.पं.ने १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ७० ग्रामपंचायतींच्या कामांना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत निविदा काढून प्रारंभ केला जाणार आहे. यात ५ हजार लोकसंख्येच्या गावास ३४५ रुपये प्रतिव्यक्ती तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावास ७०५ रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे हा निधी मिळत असल्याने आधीच तो अपुरा आहे. त्यात रोहयो, वित्त आयोगाची सांगड घातल्याने अजून बिकट प्रश्न बनला आहे. त्यातच काही ठिकाणी ग्रा. पं. च्या कामात जि. प. कडून हस्तक्षेप वाढल्याने पेच निर्माण होत आहे.

या योजनेत सध्या २.६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर ४.१८ कोटींची मागणी आहे. केंद्र व राज्याचा मिळून स्वच्छ भारत मिशनचा ६.८१ कोटींचा हिस्सा राहणार आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून २.९२ कोटी द्यावे लागतील. मनरेगातून मजुरीवर २.४३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तर ही कामे पूर्ण होऊ शकतात.

या ७० गावांची झाली निवड

हिंगोली तालुक्यात फाळेगाव, सावरगाव बं, खानापूर चित्ता, नर्सी ना., बळसोंड, पेडगाव, पहेनी, बासंबा, आडगाव, कोथळज, पांगरी, इसापूर, साटंबा, खेड, सरकळी, कनका, कळमनुरी तालुक्यात बाभळी, पाळोदी, आखाडा बाळापूर, उमदरवाडी, वारंगा फाटा, वाकोडी, येहळेगाव तु., पोतरा, दांडेगाव, मसोड, बोथी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव गवळी, दाती, सेलसुरा, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, पानकन्हेरगाव, केलसुला, केंद्रा बु., पुसेगाव, कडोळी, जवळा बु., साखरा, ताकतोडा, भानखेडा, कवठा बु., बन, औंढा तालुक्यात पिंपळदरी त. नांदापूर, अनखळी, अंजनवाडी, अजरसोंडा, शिरडशहापूर, भोसी, जलालदाभा, येहळेगाव सोळंके, माथा, उखळी, जडगाव, पूर, सोनवाडी, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील आरळ, किन्होळा, कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभूळगाव, अकोली, आसेगाव, परळी या गावांचा समावेश आहे.

नवीन ३३५ गावांचा आराखडा

जुनीच कामे झाली नसताना नवीन ३३५ गावांचा आराखडा सादर केला आहे. यात औंढा ६२, वसमत ७१, हिंगोली ७०, कळमनुरी ६६, सेनगाव ६६ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यासाठी ३२.७७ कोटी लागणार आहेत. यात स्वच्छ भारत मिशनला १९ कोटी, १५ व्या आयोग ७.५० कोटी तर एमआरईजीएसमध्ये ६.२५ कोटींचा भार उचलावा लागेल.