लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १0 सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी व बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते व आ. डॉ. संतोष टारफे यांनी केले आहे.९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शेख निहाल, विलास गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. वडकुते म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत मते घेणाऱ्या भाजप सरकारने केवळ जनतेची दिशाभूल केली. जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यात आता वाढत्या महागाईमुळे जनता भरडून निघत आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आ. वडकुते यांनी केले.आ. संतोष टारफे म्हणाले, सरकारने काळा पैसा तर आणला नाही. मात्र लोकांचे मेहनतीचे पैसे लूटत आहे. जनतेला दिलेली विकासाची आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे येत्या निवडनुकीत जतनाच त्यांना माफ करणार नाही. वाढत्या महागाईचे चटके जनतेला बसत आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी व सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.वसमत : सरकारकडून अमाप स्वरूपात होणाºया इंधन भाववाढीचा निषेधार्थ वसमत शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबर रोजी बंदचे आयोजन करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:14 AM