‘शाळाबाह्य मुलांची अद्ययावत माहिती द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:40 AM
जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दाखल झालेले शाळाबाह्य मुले किती आहेत आदी माहिती माहिती भरून द्यावी लागणार आहे.
<p>लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दाखल झालेले शाळाबाह्य मुले किती आहेत आदी माहिती माहिती भरून द्यावी लागणार आहे.शिक्षणापासून एकही मुल वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेशित करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक बालकांना जवळील शाळेत प्रवेश दिला होता. आता संबधित गटशिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील शाळाबाह्य मुलांची केंद्रनिहाय अद्ययावत माहिती सर्व शिक्षा अभियान जिल्हा कार्यालयात दाखल करण्याच्या सूचना प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यातील एकूण शाळाबाह मुले, तसेच ज्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला आहे, हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत किंवा नाहीत, यासह विविध आढावा शिक्षणाधिकाºयांकडून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच गटशिक्षणाधिकाºयांना शाळाबाह्या मुलांची अद्ययावत माहिती सादरीकरणाच्या सूचना आहेत.सर्व शिक्षा अभियान जि. प. हिंगोली व डीआयईसीपीडी यांच्या संयुक्त विद्येमाने जिल्हाभरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती भरून देण्यासाठी संबधित गशिअ यांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेला तक्ता भरून द्यावा लागणार आहे. यामध्ये प्रथम तालुक्याचे नाव, केंद्राचे व मुलाचे नाव, स्थलांतर, शाळाबाह्य, अनियमित याप्रकरची माहिती. तसेच मुल शाळेत न येण्याचे कारण, मुलांमधील जीवन कौशल्य, मुल नियमित शाळेत यावे यासाठी घेण्यात आलेली दक्षता यासह विविध माहिती गशिअ यांना देण्याच्या सूचना आहेत. परजिल्ह्यातून आलेले दगडफोड कामगार तसेच गाव, वस्ती तांडा वाड्यावरील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशित करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात एकही मूल शाहाबाह्य राहू नये, यासाठी मोहिम राबविली जात आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.