लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च निमित्त जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जनजागृती कार्यक्रम तसेच चित्ररथाचे उद्घाटन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, डॉ. किशोर श्रीवास, डॉ. मंगेश टेहरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.राहूल गिते, डॉ. जी.एस. मिरदुडे आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. शिवाजी पवार व डॉ. किशोर श्रीवास यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. क्षयरोग उच्चाटनासाठी उपस्थितांसह सर्वांनी शपथेचे वाचन केले.प्रास्ताविकात डॉ. राहुल गिते यांनी मागील वर्षी झालेल्या कामाकाजाचा आढावा मांडला. मागील वर्षी २०१८ मध्ये एकूण ११७ क्षयरुग्ण शोधून काढल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार सुरू असलेल्या क्षयरुगणांना दरमहा ५०० रुपये पोषण आहार योजनेंतर्गत रुग्णाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने क्षयरोगाविरूद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गीते यांनी केले. डॉ. किशोर श्रीवास जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले की, क्षयरोग हा आपल्या जिल्ह्यात होऊच नये, यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. क्षयरोगाला हद्दपार करू, समाजात जाणीवजागृती निर्माण करून क्षयरोग हा रोग भयंकर नसून त्यावर प्रभावी औषधी उपलब्ध असून नियमित व पूर्ण औषधे घेतल्यास क्षयरुग्ण पूर्णपणे हमखास बरा होतो, असे सांगितले.यावेळी शाहीर प्रकाश दांडेकर यांचा जनजागृती कार्यक्रमाचा कार्यक्रम झाला. लोककला व लोकगीताच्या माध्यमातून क्षयरोग जनजागृती करण्यात आली. यावेळी नरेंद्र अग्रवाल यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी क्षयरुग्ण व त्यांचे नातेवाईक, नागरिक, व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, डापकू, एआरटी कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डापकूचे उद्धव कदम यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. जी.एस. मिरदुडे, सुभाष मुदीराज, बालाजी चाफाकानडे, डी.एस. चौधरी, एस.जे. शिंदे, बालाजी उबाळे, एस.एन. शिरफुले, सी.जे. रणवीर, संदीप गवळी, जोशी, डाफणे, विहान प्रकल्पाच्या अलका रणवी, प्रवीण मोरे, गजानन आघाव, आर.व्ही. घुगे, मयुरी सोनवणे, प्रसाद कुलकर्णी, श्रीरंग डुकरे, मनोज देशपांडे, आर.डी. भोसले, घावडे, बोथरा, माने, डोल्हारे, जायभाये आदींनी परिश्रम घेतले. तर आर.टी. पुंडगे यांनी आभार मानले.जास्तीत जास्त क्षयरुग्ण भारतात असून या सर्व रुग्णांवर शासकीय आरोग्य संस्थेत क्षयरोगाची मोफत थुंकी तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात. क्षयरोग होवू नये म्हणून आपण प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागात क्षयरोग मोफत तपासणी व मोफत औषधी उपलब्ध असून सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:32 AM