शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:25 AM

जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. पहिल्या टप्प्यातील शेतकरी आता चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत. त्यातच हमीभाव केंद्रांवरील अनियमिततेच्या संकटाने अजून पाठ सोडली नसल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू आहे. त्यावर नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर खरेदी होत आहे. मात्र कधी-मधी शेतकºयांना मुक्काम करुन तूर विकण्याची वेळ अजून कमी झालेली नाही. तर नाफेडच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना तूर माघारी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या खरेदी केंद्रावर माळहिवरा येथील एका शेतकरी तूर घेऊन येण्याचा एसएमएस आल्याच्या दुसºया दिवशी म्हणजे २० मार्च रोजी आला तरीही अजून तूर मोजणी झालेली नव्हती. सदर शेतकरी सुधाकर जाधव यांना स्वत:च्या पुतणीच्या साखरपुड्यासही यामुळे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा इशारा देताच नाफेडची यंत्रणा खडबडून जागी झाली व तूर खरेदी केली. कळमनुरीतील प्रकार तर राज्यभर गाजत आहे. तूर खरेदीसाठी शेतकºयाकडून ४0 हजारांची लाच घेतानाच तिघांना पकडले. इतरही केंद्रांवर नाफेडची मंडळी अशीच थोडीबहुत परिस्थिती इतरत्रही आहे. मात्र शेतकºयांना हमीभावासाठी निमूटपणे हे सगळे झेलावे लागत आहे.आतापर्यंत १२.३७ कोटी रुपयांची तूर खरेदी झालेली असली तरीही अजून चुकारे वाटपास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी अनियमिततेमुळे चुकारे लटकले होते. निदान या वेळेस तरी काही गोंधळ होऊ नये याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. मोठ्या पोटतिडकीने शेतकरी चुकाºयांची चौकशी मार्केट कमेटीकडे करीत आहेत. त्या प्रत्येक शेतकºयांना नव- नवीन तारीख सांगून काढून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.शासनाने तूर खरेदीसाठी १९ हजार कोटीला मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्टÑासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे तूर खरेदी झालेल्या शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कागदपत्र बरोबर असणाºया शेतकºयांच्याबँक खात्यावर आॅनलाईन चुकारे जमा होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांनी नि:संकोचपणे हमी केंद्रावर तूर विक्री करण्याचेही आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.नाफेडच्या खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीचा गोंधळच सुरु आहे. त्यामुळे तूर विक्रीस घेऊन आलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मुक्काम टाकण्याची वेळ अजून तरी टळलेली नाही.असे आहे तूर खरेदीचे चित्रहिंगोली जिल्ह्यात २२ हजार ७०२ क्विंंटल तुरीची खरेदी केलेली आहे. यामध्ये हिंगोली येथील खरेदी केंद्रावर २५० शेतकºयांची ३ हजार ४८४ क्विंटल, सेनगाव येथे ४९७ शेतकºयांची ५ हजार ७८८ क्विं, कळमनुरी ६३८ शेतकºयांची ६ हजार ११५ क्विं तर वसमत येथे ३९२ शेतकºयांची २ हजार ७०४ क्विंटल, जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ४९१ शेतकºयांची ४ हजार ६११ क्विंटल अशा एकूण २ हजार २६८ शेतकºयांची २२ हजार ७०२ क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील ६१५८ क्ंिवटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचली तर १६ हजार ५४३ क्विंटल पोहोचणे बाकी आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीMONEYपैसाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र