शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वराच्या दर्शनासाठी औंढ्यात भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 5:48 PM

यंदा नागनाथ संस्थांनच्यावतीने अपंग दिव्यांग व्यक्तींना थेट दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिले आहे.

ठळक मुद्देराज्यासह देशातील भाविक दर्शनालारात्री निघणार श्रीची  पालखी

- गजानन वाखरकर 

औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील नागनाथाच्या दर्शनासाठी येथे भक्तांचा जनसागर उसळला आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी रात्री व सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यभर आणि दिल्ली ,कर्नाटक ,तेलंगणा ,हरियाणा, पंजाब, गुजरात ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. 

हर हरमहादेव, नागनाथ महाराज की जय अशा जयघोषात भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त नागनाथाचे दर्शन घेतले. प्रभू नागनाथाची महापूजा करण्यात आली मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खासदार हेमंत पाटील,  आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहसचिव विद्या पवार, आनंद नीलावर यांच्या हस्ते करण्यात आली. भक्तांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या  आहेत तसेच  विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा नागनाथ संस्थांनच्यावतीने अपंग दिव्यांग व्यक्तींना थेट दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिले आहे. शिवाय भाविकांना दर्शन रांगेमध्येच  पाणी, चहा व फराळाची व्यवस्था केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. येथील दर्शन व्यवस्था अतिशय कठीण असल्याने एका भाविकाला दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गर्भगृह लहान असल्याने गर्दीच्या वेळी ही समस्या उद्भवत असते. परंतु या काळात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर संस्थांनच्यावतीने अभिषेक पूजा व इतर पूजा बंद करण्यात आल्या आहेत. भाविकांना दर्शनाची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून विश्वस्त मुंजाभाऊ मगर, देविदास कदम, गजानन वाखरकर, पंजाबराव गव्हाणकर, डॉ. विलास खरात, गणेश देशमुख आदी प्रयत्न करत आहेत. यासह मंदिर परिसरात ४०० पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बालाजी काळे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची उपस्थिती आहे. 

रात्री निघणार नागनाथांची पालखी रात्री सात वाजेच्या सुमारास श्री नागनाथाची पालखी मिरवणूक रावलेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. रावलेश्वर हे प्रभू नागनाथाचे मामा असल्याने त्यांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी स्वतः महादेव यांची भेट घेऊन शिवपार्वती विवाह सोहळा येण्याचे आमंत्रण देतात अशी आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने ही पालखी मिरवणूक परंपरेनुसार  काढल्या जात असल्याची माहिती संस्थांनचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांनी दिली. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीHingoliहिंगोली