पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलिसांच्या वतीने झीरोफाटा ते नागेशवाडी या रस्त्यावर चालणाऱ्या उसाच्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून, रेडियम लावण्याचे काम हट्टा पोलिसांनी केले आहे. बाराशिव कारखाना येथे उसाच्या सर्व ट्रॅक्टरला तसेच इतर वाहनांलाही रेडियम लावले. उसासाठी येणाऱ्या ट्रॅक्टरचालकांचा परवाना तसेच भरधाव ट्रॅक्टर चालविणे, गावातून जात असताना जोराने वाद्य वाजविण्यायाबाबतच्या सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविला असून यापूर्वी जवळा बाजार ते हट्टा या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम हट्टा पोलिसांनी केले. तसेच रस्त्यावर येणारे झाडेझुडपे पोलिसांच्या वतीने कापण्यात आली. यावेळी हट्टा ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, पोउपनि संदीप थडवे, जमादार बी. जी. राठोड, बालाजी जाधव, शेख खतीब, राजेश ठाकूर, राजाराम कदम, सचिन सांगळे, प्रवीण चव्हाणसह बाराशिव कारखान्याचे कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते. फाेटाे नं.२०
पोलीस स्थापना दिनानिमित्त वाहनांना लावले रेडियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:30 AM