वसमत शहरातील सोमवार पेठ भागात सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर वसमत शहर पोलिसांनी १८ सप्टेंबरला पहाटे एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सात जुगाऱ्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून रोख १२ हजार ५०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक दिलीप पोले यांच्या फिर्यादीवरून बालाजी संभाजी क्षीरसागर, प्रशांत बालाजी टाक, प्रकाश काशिनाथ सुतार, मारोती तुकाराम पेटकर, प्रदीप उत्तम रापतवार, सुधाकर मधुकरराव डाहाळे, सागर सुभाष लालपोतू (सर्व, रा. गणेशपेठ वसमत) याचेविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक भगीरथ संवडकर करीत आहेत.
दुसरी कारवाई औंढा तालुक्यातील पुरजळ येथे करण्यात आली. पुरजळ येथील बसस्थानक भागात सुरू असलेल्या मटका जुगार खेळविताना एकावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून रोख ११५० व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई १७ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून दिगांबर तुकाराम जाधव (रा. पुरजळ) याचेविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड करीत आहेत.
- गोरेगावात चार जुगाऱ्यांवर कारवाई
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील भीमाशंकर महाराज मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत सुरू असलेल्या झन्ना-मन्ना नावाच्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी १७ सप्टेंबरला छापा टाकला. यावेळी पोलिसांनी चार जुगाऱ्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर केशवराव कावरखे, विनोद ज्ञानबा धामणकर, विजय सीताराम कावरखे, निळकंठ ऊर्फ निळू रामकिशन धामणकर (सर्व, रा. गोरेगाव) याचेविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.