हिंगोली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान येथील रेल्वे स्टेशनवर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केले. यावेळी स्थानकावर पुर्णा-अकोला ही पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती.
अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर एका युवकाने हल्ला करून धक्काबुकी केली. या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या कार्यकर्त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळी निदर्शने करत रेलरोको आंदोलन केले. यावेळी केंद्रीयमंत्री आठवले यांना झेड-प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याचे निवेदन स्टेशन अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष वसंत मुळे, मिलींद कवाने, सुरेश वाढे, बाबासाहेब वाहुळे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, बाबुराव इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.