लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव, आंबा चौंढी, पांगरा शिंदे येथे सकाळपासून कडकडीत शांततेत बंद पार पडले असून पांगरा शिंदे येथे रेल्वेस्थानकावर अकोला- पूर्णा पॅसेंजर रेल्वे थांबवून आंदोलन करण्यात आले.कुरूंदा येथे व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवली. शांततेत बंद पार पडला.पांगरा शिंदे येथे सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून सरकारविरोधी घोषणा देऊन रॅली काढली. त्यानंतर रेल्वे रोको आंदोलन केले. अकोला येथून पूर्णेकडे जाणारी रेल्वे पांगरा शिंदे रेल्वे स्थानकावर येताच पूर्णा अकोला पॅसेंजर रेल्वे आंदोलकांनी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अर्धा तास थांबवून शांततेत आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे पूर्णाकडे मार्गस्थ झाली. गिरगाव येथे कडकडीत बंद ठेवून गिरगाव फाटा येथे वसमत- नांदेड रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले. आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. या सर्कलमधील मराठा समाज बांधव आंदोलनात सहभाग होता.या भागामध्ये शांततेत बंद व आंदोलन पार पडले असून कुरूंदा पोलीस ठाण्याच्या वतीने सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके, जमादार शंकर इंगोेले, वाघमारे, बी.टी. केंद्रे, आमले, राठोड, सोनुने, भोपे, मात्रे, कदम आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रेल्वे रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 1:23 AM