यामध्ये हिंगोली १७.४० मिमी, कळमनुरी १७.९०, वसमत ७.७०, औंढा ६.७० तर सेनगाव ६.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारीही दिवसभर हिंगोलीसह परिसरात रिमझिम पावसाची हजेरी कायम होती. तर सूर्यदर्शनही झाले नाही. मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली होती. त्यामुळे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली होती. माळरानावरील पिकांनी तर काही प्रमाणात मानाही टाकल्या. मात्र या पावसाने अशी पिके पुन्हा तरारत असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा सगळीकडे हिरवाई नटली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे नदी, नाले वाहते झाले आहेत. काही भागातील तलावांतील जलसाठाही या पावसाने वाढला आहे. हिंगोली जिल्ह्यात यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचेही दिसून येत आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिमझिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:33 AM