शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 6:56 PM

राज ठाकरे यांनी आतापर्यंत मनसेचे चार उमेदवार जाहीर केले असून यातील दोन उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात आहेत.

MNS Raj Thackeray ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून मागील काही दिवसांपासून ते राज्यातील काही जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूरनंतर आज त्यांनी हिंगोलीत दाखल होत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज यांनी अप्रत्यक्षरीत्या मनसेचा विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात तुम्ही आता बंडू कुटे यांच्याकडे लक्ष द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि मतदारांना केलं.

राज ठाकरे यांचं आज हिंगोलीत मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. जिल्ह्यात राज यांची एंट्री होताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. ही आढावा बैठक संपल्यानंतर राज यांनी बंडू कुटे यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही आता यांच्याकडे लक्ष द्या, असं म्हणत कार्यकर्त्यांना कुटे यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं आवाहन त्यांनी केलं. बंडू कुटे हे मनसेचे विद्यमान हिंगोली जिल्हाध्यक्ष आहेत. 

भाजपला थेट आव्हान

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली होती. लोकसभेनंतर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंचा पक्ष महायुतीसोबतच राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेत 'एकला चलो रे'चा नारा दिल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत पक्षाचे चार उमेदवार जाहीर केले असून यातील दोन उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात आहेत.

हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपचे तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत. बंडू कुटे यांच्या रुपाने राज ठाकरे यांनी आपला मनसैनिक विधानसभेच्या रिंगणात उतरवला आहे. तसंच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं यंदा चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांनी  शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दिलीप धोत्रे आणि लातूर विधानसभा मतदारसंघात  संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hingoli-acहिंगोली