औंढा नागनाथ : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या या मागणीसाठी जिंतूर टी-पॉईंटवर शेतकऱ्यांनी साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन केले. अर्धातास चालेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जिंतूर टी-पॉईंट येथे रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ज्योती लाखाडे यांना दिले.
आंदोलनात साहेबराव चव्हाण ( भाजपा युवा जिल्हा सचिव ), आत्माराम राठोड ( उपसरपंच ), प्रकाश चव्हाण ( चेअरमन), पंडित चव्हाण, श्रीराम राठोड, बाबुराव चव्हाण, राजू चव्हाण, संतोष चव्हाण आदींसह शेतकऱ्यांचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोर, जमादार राजेश ठाकूर, मंडळाधिकारी केशव अंभोरे, जमादार संदीप टाक, शिवाजी पाचपुते, गणेश लेकुळे, राजेश्वर असे, हिरामन चव्हाण, बालाजी जाधव, अरविंद गजभार, शेख मदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.