हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा येथे दोन दिवसांपूर्वी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी १० वाजता हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यानहिंगोली-परभणी महामार्गावर १ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेनंतरही आरोपीविरोधात पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे या घटनेच्या निषेधार्त संतप्त समाज बांधवांनी आज रास्तारोको केले. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करुन संबधित समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सपोनी गुलाब बाचेवाड, गणेश लेकुळे, राजू गुट्टे, इम्रान सिद्दिकी, नय्यर शेख आदी कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.