वसमत (हिंगोली ) : दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, दुकान बंद करण्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्यास धक्का-बुक्की झाली आणि गावात तणाव निर्माण झाला.
तालुक्यातील गिरगाव येथे दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बंदचे आवाहन करताना वाद झाला. यावेळी एका व्यापाऱ्यास धक्का-बुक्की झाली. त्यामुळे गिरगावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. चौकात मोठा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद, सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.
जवळा बाजार येथे रास्ता रोकोसंविधान जाळल्याच्या निषेधार्थ औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काहीवेळ वाहतूक ठप्प होती. शिरडशहापूर येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला.