शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

हिंगोलीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:35 PM

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भीषण आग लागली.

ठळक मुद्देआगीत वाहनांच्या नोंदणीचा दस्तावेज जळून खाक झाला आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोली :  येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत वाहनांच्या नोंदणीचा दस्तावेज जळून खाक झाला आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीनजीक औंढा नागनाथ मार्गावर आहे. जुन्या इमारतीत या कार्यालयाचा कारभार चालतो. या कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. ३१ मे २0१८ रोजी ती उपप्रादेशिकला हस्तांतरित होणार होती. मात्र अजूनही तारीख पे तारीखच सुरू आहे. त्यातच बुधवारी पहाटे जुन्या कार्यालयात आग लागली. या कार्यालयाच्या मागेच एकजण निवासी आहे. त्याने परिवहनच्या अधिकाऱ्याना कळविले. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी मुख्याधिकारी रामदास पाटील, पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्यासमवेत घटनास्थळ गाठले. या दरम्यान अग्निशामकचे वाहनही घटनास्थळी पोहोचले होते. अर्ध्या तासांत आग विझविण्यात आली.

संचिका जळाल्या

यात वाहनांच्या नोंदणी, कर भरणा पावत्या आदींच्या संचिका ठेवलेल्या होत्या. यात नोंदणीच्या शेकडो संचिका जळाल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर तीन संगणक, फर्निचर जळाल्याने नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमके कारण अजून समजले नाही.

दस्तावेज ऑनलाईनवर उपलब्ध याबाबत विचारले असता परिवहन अधिकारी पवार यांनी सांगितले की, या आगीत वाहन नोंदणीच्या संचिका जळाल्या. मात्र हा दस्तावेज आॅनलाईनवर उपलब्ध असतो. त्यामुळे त्याची एवढी अडचण नाही. महत्त्वाच्या अनेक संचिकांना धक्का लागला नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसHingoliहिंगोलीfireआग