हिंगोली: नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नती त्वरित भराव्यात आणि इतर मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील वर्ग ३ चे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून हे कार्यालय बंद आहे.
२१ सप्टेंबरपासून संपास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्या ज्येष्ठता याद्या त्वरित निकाली काढणे, विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, विभागीय चौकशीची कार्यवाही विहित मुदतीत पार पाडावी, नवीन आकृतीबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे कायम ठेवावेत, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरावीत, खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घ्यावी, बदल्या करताना संघटनेस विचारात घ्यावे आदी मागण्यांचा संपात समावेश आहे.
मागण्यांवर मुंबई येथे चर्चा सुरू...
२१ सप्टेंबरपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वर्ग ३ चे पदाधिकारी मुंबई येथे गेले आहेत. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. बुधवारी त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाऊन तोडगा निघण्याची आशा आहे. वर्ग १, २ व सेवक वर्ग संपावर नाहीत.
- एस.जी. सुंकवाड, अराजपत्रित कर्मचारी संघटना, हिंगोली जिल्हाध्यक्ष.
फोटो आहे