लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच चोरींच्या घटना व इतर मालमत्ता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा २२ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घेतला. यावेळी चावरिया यांनी प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना सर्व ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना दिल्या आहेत.पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर रोजी प्रलंबित गुन्हेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात, पोनि जगदीश भंडरवार, पोनि पोनि अशोक मैराळख् मधुकर कारेगावकर, पोनि उदयसिंग चंदेल, सपोनि शिवरामवार तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आढावा बैठकीस हजर होते.सदर आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी विविध ठाण्यातील कार्यालयीन कामांचा आढावा घेतला. तसेच प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेत संबधित ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना गुन्ह्यांचा तत्काळ निपटारा लावून दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच बैठकीस उपस्थित पोलीस अधिकाºयांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते.घरफोडी, जबरीचोरी गुन्हे उघकीस आणा...हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रलंबित गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक चावरिया यांनी विविध पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनाव व दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबधित ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना सूचना दिल्या. तसेच दाखल झालेले प्रलंबित गुन्हे यामध्ये घरफोडी, जबरीचोरी, चोºया व इतर मालमत्ताविरूद्ध असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक चावरिया यांनी सूचना दिल्या.
हिंगोलीतील प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:39 PM
जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या तसेच चोरींच्या घटना व इतर मालमत्ता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा २२ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घेतला. यावेळी चावरिया यांनी प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना सर्व ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना दिल्या आहेत.
ठळक मुद्देहिंगोली : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिल्या सूचना