लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : शेतकरी अनुदानाच्या कोणत्याही योजना राज्यातील शासकीय, खाजगी बाजार समितीसह, थेट पणनमध्ये शेतमाल विक्री करणाºया शेतकºयांना लागू राहणार असल्याचे पत्रक पणन संचालक पुणे यांनी काढले आहे. त्यामुळे शेतकºयांमधील शेतमाल विक्रीचा संभ्रम दुर झाला असून शेतकरी यापुढे कुठेही आपला शेतमाल विक्री करु शकतील.राज्यात मोठ्या प्रमाणात खाजगी बाजार समिता मागील काही वर्षांपासून अस्तित्वात आल्या आहेत. शासकीय बाजार समित्यांसह खाजगी बाजार समित्यात स्पर्धा लागली आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव व सोई-सुविधा मिळत आहे. परंतु खाजगी बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाºया शेतकºयांना शासनाच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी चर्चा काही शासकीय बाजार समितीमार्फत केली जात होती. त्यामुळे शेतकºयांसमोर खाजगी बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री करावा की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दुर करण्यासाठी पुणे पणन संचालक दिपक तावरे यांनी वाशीम व कारंजा येथे निर्माण झालेल्या प्रकरणाच्या उद्देशाने २१ डिसेंबरला परिपत्रक काढले असून शेतकºयांच्या लाभासाठी असलेली कोणतीही योजना राज्यातील सर्व शेतकºयांसाठी लागू असते. शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून अन्य खाजगी बाजार समिती व थेट पणनमध्ये शेतमाल विक्री करणाºया शेतकºयांना कोणतेही अनुदान मिळणार नाही असा संभ्रम काही दिवसांपासून निर्माण झाला असून तो चुकीचा आहे. खाजगी बाजार व थेट पणनमध्ये शेतमाल विक्री करणाºया शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवू नये, याकरीता स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता शासनाच्या सर्व अनुदान योजना खाजगी बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाºया शेतकºयांना लागु आहेत असे परिपत्रक थेट पणन संचालकानीच काढले असल्याने हा गोंधळ थांबणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीचा संभ्रम दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:56 PM