लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडणे अनिवार्य होते. मात्र त्यातील काहींची दुरुस्ती होत आहे आणि काही रस्ते मात्र तसेच सोडून दिल्याने चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. होणाऱ्या या दुजाभावाबद्दल आता नागरिकांतूनच बोंब उठत असून नेमके कोणत्या निधीतून हे काम होतेय, हे कळायला मार्ग नाही.हिंगोली शहरात भूमिगत गटार योजनेचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. काही भागात लेव्हल जुळविण्यासाठी प्रचंड खोदकाम करावे लागल्याने कामास विलंब होत गेला. त्यातच खाली काळा पाषाण लागल्याने नागरि वस्तीत ब्लास्टिंगही करणे शक्य नव्हते. त्यामुळे या हतबलतेत आदर्श महाविद्यालय परिसर व रिसाला बाजार भागातील नागरिकांनी मोठा त्रास सहन केला. तरीही अजून रिसाला बाजार भागातील काम बाकी आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर पूर्वीचे काम पूर्ण केल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी नवीनच प्रश्न समोर आणला आहे. शहरातील शास्त्रीनगर भागात भूमिगत गटार योजनेसाठी खोदकाम केले अन् चिखल होऊ नये, याची काळजी घेताना त्यावर सिमेंट रस्ता टाकून दुरुस्ती केली. मग आमच्या भागात का नाही, असा त्यांचा सवाल आहे. शिवाजीनगरच नव्हे, तर इतरही भागांत रस्ते चिखलमयच आहेत. मग याच भागातील दुरुस्ती नेमकी कोणत्या निधीतून झाली, हे न.प. प्रशासन व पदाधिकाºयांनी जाहीर करण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत तोंडी तक्रारी होत असल्या तरीही लेखी कुणीच करीत नसल्याची बोंब आहे.सगळीकडेच होणार कामे- मुख्याधिकारी४दरम्यान, भूमिगत गटार योजनेचे काम झालेल्या सर्वच भागांतील रस्त्यांची दुरुस्ती होणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. सध्या मात्र ज्या भागात अत्यंत गरज आहे, अशाच भागातील काही कामे केली आहेत.उन्हाळाभर कोणतीच हालचाल न करता पालिकेचा पावसाळ्याच्या तोंडावर आलेला रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी फेटाळला. कामाचा दर्जा राहावा, यासाठी हा योग्य काळ नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
‘ती’ दुरुस्ती कोणत्या निधीतून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:31 PM