या प्रयोगशाळेची २०० ची तपासणी क्षमता आहे. मात्र, रोज ६०० ते ७०० स्वॅब तपासून अहवाल तयार केले जातात. जर स्वॅब नमुने यापेक्षा जास्त आले, तर ते दुसऱ्या दिवशी लावण्याची वेळ येते. मात्र, याच तुलनेत स्वॅब घेतले जातात. कधी कधी यापेक्षा जास्त स्वॅब आल्यावर विलंब होतो. आता नवीन मशीन येणार आहे. ती आल्यावर आणखी ३५० ने क्षमता वाढणार आहे, तर एकूण १,२०० पेक्षा जास्त स्वॅबचे अहवाल एकाच दिवशी देणे शक्य होणार आहे. दोन ते तीन दिवसांत ही मशीन येईल, असे अपेक्षित आहे.
आले त्यादिवशीच स्वॅब तपासणीला
ज्यादिवशी आमच्याकडे थ्रोट स्वॅब येतात. बहुधा त्याचदिवशी ते सर्व तपासणीला लागतात. सातशेपेक्षा जास्त स्वॅब आले, तर तेवढ्यांची दुसऱ्या दिवशी तपासणी होते. स्वॅब घेतले कधी हे आम्हाला कळत नाही. मात्र, जेवढ्या लवकर आमच्याकडे येतील, तेवढ्या लवकर अहवाल देणे शक्य आहे. क्षमतेपेक्षा जास्त स्वॅब आल्याशिवाय विलंब होत नाही.
-डॉ. संजीवन लखमावार, प्रयोगशाळाप्रमुख