२९ एप्रिल रोजी नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचाऱ्यांनी १४ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. यामध्ये करनिर्धारक, प्रशासकीय सेवा कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी, सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरित द्यावी, सफाई कामगारांचे राहणीमान उंचावण्यासाठी मोफत घरे वाटप, नगर परिषदांनी जागा आरक्षित करावी, सध्या कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे राखीव बेड मिळावेत व कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवावा, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
शासनाने मागण्यांचा विचार न केल्यास १५ मेनंतर संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. के. अंधळे, राज्य उपाध्यक्ष भ. ना. बोडके, सरचिटणीस आनंद दायमा, राज्य अध्यक्ष डी. पी. शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.