लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ येथील संस्थानवर असलेल्या एका विश्वस्तांनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे राजीनामा दिला. मात्र विश्वस्तांच्या सूचनांना काडीचे महत्त्व नसून गैरव्यवहार वाढल्याचा आरोप केला असून या सगळ्या बाबींचा उल्लेख करून ‘धर्मादाय’ने हा राजीनामा मंजूर केला.औंढा नागनाथ येथील संस्थानचा कारभार चालविणाऱ्यांची कायम एकमेकांवर कुरघोडी सुरू असते. काम कमी अन् राजकारण जास्त अशी स्थिती असून त्यातच कामाचा प्रचंड व्याप असताना तहसीलदार त्याचे अध्यक्ष असतात. त्यामुळे कुणाची फारसी दखल घेतली जात नाही. विश्वत महेश बियाणी यांनीही अनेकदा गैरकारभाराचा लेखाजोखा मांडूनही संस्थान अध्यक्ष व सल्लागार त्यावर ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप केला. सूचनाही पाळत नाहीत. भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण करीत नाहीत. धर्मादायचे ऐकत नाहीत.ठरावांवर अंमल नाही, देणगी दररोज बँकेत जात नाही, अस्वच्छता, विकासाकाडे दुर्लक्ष, भक्त निवास २ मध्ये कर्मचाºयांचे अवैध होणारे काम, विश्वस्त व सल्लागारांचे वैयक्तिक हीत जोपासण्याचे संस्थान प्रशासनाचे प्रयत्न आदी आरोप केले. तर संस्थानमध्ये गैरव्यवहार व गैरसोयी असताना काही करता येत नसल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले.
औंढा संस्थानच्या विश्वस्ताचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:19 AM