शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

भीमा-कोरेगावप्रकरणी बंदला हिंगोलीत प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:28 AM

भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. कळमनुरीत मात्र जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर वसमत येथे आॅटो जाळून नुकसान करण्यात आले.

ठळक मुद्देकळमनुरीत सौम्य लाठीमार : वसमतला आॅटो जाळली, डोंगरकडा, फाळेगाव फाट्यावर रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. कळमनुरीत मात्र जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर वसमत येथे आॅटो जाळून नुकसान करण्यात आले.हिंगोली शहरात आज बंद नव्हता. गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे. मात्र नर्सी टी पॉर्इंटवर एका टिप्परवर दगडफेक झाली. गांधी चौक भागात भारिप-बमसंच्या वतीने संविधान कॉर्नर येथे जोरदार घोषणा देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर या घटनेतील आरोपी मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.सेनगाव बंदलोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : भीमा कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजयी स्तंभाजवळ झालेल्या दंगलीची सीआयडीमार्फत चौकशी करून समाजकंटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणी सह सदर घटनेचा निषेधार्थ मंगळवारी सेनगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेचे तिव्र पडसाद सेनगाव शहरात उमटले.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक संघटनेचा वतीने सेनगाव बंद चे आवाहन करण्यात आले.त्या मुळे शहरातील सर्व बाजारपेठ आज दिवसभर कडकडीत बंद होती. घटनेचा निषेध करीत. दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्च्या काढून तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. प्रकाश खंदारे, माजी सरपंच संजय वाघमारे, मनिष वाकळे, राजू वाघमारे, विजय खंदारे, सुनिल वाघमारे, वसंत वैराट, अनिल वाघमारे , गोपाल खंदारे, रमेश गायकवाड, रवि गवळी आदीसह समाज बांधव सहभागी झाले होते.फाळेगाव पाटीवरील शाळा केल्या बंदलोकमत न्यूज नेटवर्ककनेरगावनाका : देवठाणा (भोयर) येथील भीम सैनिकांनी भीमा कोरेगाव येथील झालेल्या घटनेसंदर्भात ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कनेरगाव- हिंगोली राज्य महामार्गावरील फाळेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी ५० ते ६० भीमसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी देवठाणा व फाळेगाव येथील जि.प.च्या शाळा बंद केल्या. त्यानंतर राज्य मार्गावर येवून रस्त्यावर काटे, झुडपे टाकून व राज्य मार्ग बंद केला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. हिंगोली ग्रामीणचे पीआय भंडारवार तसेच सहकारी राजेश ठोके, पोले, शेख जावेद, राजू ठाकूर, कातखेडे, भिसे यांनी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी विकास धवसे, भगवान धवसे, दिलीप कांबळे, भास्कर धवसे, बाबूराव दीपके, संतोष धवसे, रमेश धवसे, सुनील वाढवे, साहेबराव धवसे, नवनाथ गायकवाड, संदीप धवसे, नंदू धवसे आदी सहभागी झाले होते.