ही बैठक गटविकास अधिकारी जगदीश साहू ,गटशिक्षणाधिकारी पांडुरंग लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी साहू यांनी उपस्थित शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे सुविधा निर्माण करणे तसेच नळ घेण्यासाठी काही अडचण आल्यास मला संपर्क करा, अशा सूचना केल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी लांडगे यांनी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती प्रस्ताव पाठविणे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, शालेय गणवेश लिंक तयार करणे, ऑनलाईन टेस्ट घेणे, पाठ्यपुस्तक पुनर्वापर करणे व वाचन करणे, २३ डिसेंबर रोजी तंबाखू मुक्त शाळा बैठक जिल्हास्तरीय ऑनलाईन आयोजित करणे, राजीव गांधी अपघात विमा योजना प्रस्ताव पाठविणे, ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे तसेच गावात विद्यार्थ्यांना भेटी, गृहभेटी शिक्षकांनी घेणे आदी विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकीत व्यासपीठावर के के गोरे केंद्रप्रमुख, के. डी. महाजन प्राचार्य, अशोक खंदारे केंद्रप्रमुख, मुरलीधर कदम केंद्रप्रमुख, एस.व्ही. लोहगावकर, शिवाजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या आढावा बैठकीला तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, हायस्कूल मुख्याध्यापक व मुख्याध्यापक हजर होते. आढावा बैठक घेण्यासाठी गटसमन्वयक किरण राठोड, मामा सूर्यवंशी, प्रेमानंद महाजन, हनुमान काळबांडे ,सीमा पटाईत,दता सूर्यवंशी, शिवाजी टोम्पे , वैशाली आमले यांनी परिश्रम घेतले. आढावा बैठकीचे प्रस्तावना के.के.गोरे तर अशोक खंदारे यांनी आभार मानले.
फोटो नं. ९