लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षण विभागात असलेल्या अपुºया कर्मचारीवर्गामुळे प्रसूती व बालसंगोपन रजामंजुरीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी हे अधिकार गटशिक्षणाधिकाºयांना बहाल केल्याचे पत्र काढले आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने प्रसूती व बालसंगोपन रजा मंजुरीसाठी वारंवार खेटे मारूनही महिला शिक्षकांना वेळेत रक्कम मिळत नाही. त्यामुळे पैशांअभावी त्यांची हेळसांड होत होती. ही बाब टाळण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून १८0 दिवसांपर्यंतच्या प्रसूती व बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकारच गटशिक्षणाधिकाºयांना दिले. तसेच यानंतर रुजू करून घेण्याचेही अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला खेटे मारण्याची वेळ यापुढे शिक्षिकांवर येणार नाही. २२ आॅक्टोबरला हे पत्र काढले आहे.सीईओंनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेत एकाच अधिकाºयांकडे तीन-तीन पदभार, अपुरे कर्मचारी त्यातही काहींना या शिक्षिकांच्या रुजू होण्याची कोणतीच काळजी नसल्याच्या तक्रारी होत होत्या.महिला ताटकळत बसल्याचेही दाखवून देत काही संघटनांनीही याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता हे सर्व प्रकार बंद होणार आहेत. शिवाय सदर शिक्षिका वेळेत आपल्या शाळेवर रुजू होण्यास मदत होणार आहे. गटशिक्षणाधिकाºयांनीही मात्र जि.प.च्या शिक्षण विभागाप्रमाणेच टोलवाटोलवी न केल्यास हे शक्य आहे. अन्यथा जि.प.चाच कारभार बरा होता, असे म्हणण्याची वेळ येवू नये.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना रजा मंजुरीचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:08 AM