लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या अभिप्रायावर अंशत: कारवाई करून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मधला मार्ग स्वीकारत रास्त भाव दुकानदारांना अभय दिले आहे.आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही ई-पॉस मशिनचा वापर धान्य वाटपासाठी केला नाही. इतरही दिलेले आदेश पाळले नाहीत. आधार सीडींग केली नाही. ई-केवायसी केली नाही. या व अशा अनेक बाबी जाणीवपूर्वक टाळत असल्याने कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाचही दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे पाठविला होता. त्या पत्राच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी या पाचही दुकानदारांना नोटिसा बजावून २४ तासांच्या आत खुलासा करण्यास बजावले होते. त्यानुसार दुकानदारांनी आपले म्हणणे जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे मांडले होते. परंतु त्यांनी केलेले खुलासे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी अमान्य केले आहेत. दुकानदाराचे म्हणणे अमान्य करून त्यांच्यावर दुकान परवान्याची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर रास्तभाव दुकानदारांना सक्त ताकीद दिली असून कामासंदर्भात दिलेले वरिष्ठांचे आदेश मान्य करून एक महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण करावीत. ई-पॉस ट्रांजेक्शनमध्ये सुधारणा न झाल्यास परवाने निलंबितचा ईशारा देण्यात आला. ३ जानेवारी २०१९ रोजी सदर कारवाई करण्यात आली असून तसे पत्र दिले आहे. आखाडा बाळापूर येथील रास्तभाव दुकानदार ओमप्रकाश ठमके, सुमन पतंगे, विश्वनाथ पेंढारकर, नंदा शंकर सेवनकर, संतोष अग्रवाल आदींच्या नावे हे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कामात टाळाटाळ करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांना सूचित केलेले कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे धान्यवाटप करणे क्रमप्राप्त झाले आहे.मध्यम मार्ग स्वीकारत दुकानांवर कारवाई...तहसीलदारांनी रास्तभाव दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मात्र मध्यम मार्ग स्वीकारत ठेवलेले आरोप खरे ठरवत दुकानदारावर कारवाई केली. आणि दुसरीकडे रास्तभाव दुकानदार यांची बाजू सावरत त्यांचा बचावही केला. एक महिन्याची मुदत देऊन प्रकरण शांत केले. येत्या काही काळात रास्तभाव दुकानदारांचे काम सुधारले का नाही, हे कळणार आहे.
रास्त भाव दुकानदारांची अनामत रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:15 AM