आमची एकजूटता हीच आमची शक्ती
कोरोना झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंबातील तरुणांनी योग्यवेळी निर्णय घेत लागलीच उपचारासाठी दाखल केले. वयस्कर, रक्तदाबाचा आजार, लहान मुले अशा वेगवेगळ्या चिंता होत्या. मात्र, डॉक्टरांनी चांगले उपचार केले. तर सर्वांनी एकजुटीने सामना करीत कोरोनावर मात केली. मित्र, आप्तेष्टांनीही मानसिक आधार देत मदत केली.
-रामचंद्र कयाल
कुटुंबातील सर्वच जण आम्ही बाधित होतो. एकमेकांना धीर दिला. सुसंवाद तर होताच, शिवाय योग्यवेळी उपचारही केले. डॉक्टरांनीही योग्य काळजी घेतली. लोकांच्या सदिच्छा, ईश्वरकृपेने आम्ही सर्व कुटुंबियांनी कोरोनावर मात केली.
-प्रमिला कयाल
आमच्या कुटुंबातील १३ सदस्य दोन टप्प्यांत बाधित आढळले. मात्र, भीती न बाळगता लक्षणे दिसताच उपचार घेतले. रुग्णालयात दाखल झालो. त्याचा फायदा झाला. आताही नागरिकांनी उपचार घ्यावे. रोगप्रतिकारकशक्तीसाठी अंडी खाणेही गरजेचे आहे.
-मयूर कयाल
माझ्या कुटुंबातील सर्वांनाच कोरोना झाला होता. मात्र, आमच्या घरचे सगळे सोबत रुग्णालयात होते. त्यामुळे मी लहान असले तरी मला या आजाराची अजिबात भीती वाटली नाही. डॉक्टर, परिचारिका या कोरोना योद्ध्यांनी आमची योग्य काळजी घेतली.
-सांची कयाल