लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागृती दिंडी काढली जात आहे. सोबातच नदीच्या पात्राचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्यावर एका तासाची डाक्युमेंट्री केली जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत ही जलचळवळ पोहोचावी हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शुक्रवार पासून सुरु करण्यात आलेल्या जलंदिडीत नदी काठावरील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. एवढेच काय तर एका गावातून दुसºया गावात पोहोचताना दिंडीला निरोप देऊन पुढील गावातील ग्रामस्थ दिंडीचे स्वागत करत होते. जवळपास सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांतील २० गावांमध्ये दिंडीद्वारे करण्यात आली. याच प्रवासा दरम्यान नदीचे विविध प्रकारचे फोटो, व्हिडीओही घेण्यात आला असून, त्यावर बनविलेली एक तासाची डॉक्युमेंट्री ती जलदूत राजेंद्रसिंह राणा यांना दाखविण्यात येणार आहे. नंतर त्यांच्या सूचनेनुसार नदीच्या पुनरज्जीवनासाठी पाऊल उचलले जाणार असल्याचे पाईकराव यांनी सांगितले. दिंडीतील सहभागींना नदी पुनरुज्जीवित का करावी, कशी कारता येईल, त्यात आपला सहभाग काय असणार आहे. अशा अनेक प्रकारच्या बाबी समजावून सांगितल्या. एवढेच काय तर नदी बारमाही झाल्यानंतर त्यापासून होणारे फायदेही ग्रामस्थांना सांगण्यात आले. खरोखर या जलचल चळवळीत ग्रामस्थांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास खरोखरच याच वर्षी पुराच्या दोन दिवसात कोरडी दिसणारी नदी बारमाही वाहती दिसण्यास मदत होऊ शकते.जलदिंडीद्वारे नदी काठावरील जवळपास १५४ गावातील ग्रामस्थांना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पथनाट्य, कलापथक, कीर्तन, गाणे इ.तून केलेल्या प्रबोधनाचा खरोखरच उपयोग होईल का? झाल्यास येत्या काही दिवसातच हे काम सुरु होणे गरजेचे आहे. निदान यंदा पडणाºया पावसाच्या एका- एका थेंबाला थांबविणे शक्य होऊन कयाधू बारमाही वाहण्यास मदत होईल. आज घडिला दिंडी कयाधूच्या काठावरील गावात नदी कशी पुनरुज्जीवित करावी इ. संदर्भात माहिती देत आहे. ४ जून रोजी दिंडीचा समारोप होणार आहे. दिंडीतील सहभागिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग झाल्यास या चळवळीला खरे यश मिळेल.
एक तासाच्या माहितीपटातून नदीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:22 AM