कुरूंदा (हिंगोली ): अकोला - पूर्णा पॅसेंजर रेल्वेने आंबाचोंडी रेल्वेस्टेशन येथे उतरलेल्या परळी येथील एका व्यापा-याला तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी लुटारुं विरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, परळी वैजनाथ येथील व्यापारी शेख सीराज शेख बशीर हे अकोला येथून पूर्णा- अकोला रेल्वेने येथे आले होते. शुक्रवारी (दि.२३ डिसेंबर) रात्री २ वाजण्याच्या सुमारास ते वसमत तालुक्यातील चोंडी रेल्वे स्टेशन येथे उतरले. दरम्यान रेल्वेस्टेशनवर तीन ते चार जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी देऊन खिशातील ५० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.