शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

हिंगोलीतील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु; पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले ई-उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 7:45 PM

यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे निदान जलद होणार आहे. 

ठळक मुद्देखासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांना यश

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ विषाणू परीक्षण संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेचे ई-उद्घाटन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. या प्रयोगशाळेची क्षमता दर दिवशी 200 ते 300 आरटी-पीसीआर चाचण्यांची आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे निदान जलद होणार आहे. 

हिंगोलीत जिल्ह्यातील आरटी-पीसीआर ही कोरोनाची महत्वपूर्ण चाचणी करणारी प्रयोगशाळा नसल्यामुळे आतापर्यंत सर्व नमुने नांदेडला पाठवावे लागत होते. मात्र आता हिंगोलीतच सदर चाचण्या होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची उभारणी 2.25 लाख खर्च करून करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रियेसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रयोगशाळेत सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी तसेच इतर तपासण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

यावेळी खासदार राजीव सातव,आ.संतोष बांगर, आ.बिप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प उपाध्यक्ष मनिष आखरे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, डॉ. शिवाजी पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. जिरवणकर, डॉ. शिबा तालिब, डॉ. पुंडगे, डॉ. चव्हाण, अधिपरिचारिका जोशी, उद्धव कदम आदींची उपस्थिती होती.

रिपोर्ट येण्याचा वेळ वाचणारहिंगोली जिल्ह्यात विविध आजारांबाबतच्या तपासण्या या लॅबमध्ये होणार आहेत. ही प्रयोगशाळा आरोग्य विभागासाठी चांगली उपलब्धी झाली आहे. कोरोना महामारीत या प्रयोगशाळेमुळे तपासण्यांना गती मिळणार आहे. ही आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अत्याधुनिक व प्रशस्त स्वरुपात आहे. आता जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे निदान होणार असल्यामुळे नांदेडहून अहवाल येण्यास लागणारा दोन ते तीन दिवसांचा कालावधी वाचणार आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमुळे रुग्णांवर केली जाणारी उपचार प्रक्रियाही जलद होईल.

खा. राजीव सातव यांच्या प्रयत्नांना यशखा.राजीव सातव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे हिंगोलीत आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली असता. त्यांनी ही मागणी मंजूर करण्या संदर्भात संबधितांना पत्राद्वारे कळविले. त्यानंतर प्रयोगशाळा उभारणीसाठी लागणारा निधी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करुन दिला. या कामाचा खा.सातव यांनी सतत पाठपुरावा केल्याने आज या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यामुळे जिल्हा आरोग्य सेवेत आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

गैरसोय टळणारवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ही प्रयोगशाळा मंजूर करून निधी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे आता जनतेची गैरसोय टळली आहे. दरम्यान दररोज तीनशे रुग्णांची तपासणी करणे शक्य होणार असून वेळेत अहवाल प्राप्त होत होणार असल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच मृत्यू टाळण्यासाठी ही सुविधा अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडcorona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली