शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

आरटीई प्रवेश, आॅनलाईन अर्जासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:12 AM

आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाई प्रवेश अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोटनक्के यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाई प्रवेश अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोटनक्के यांनी केले आहे.जिल्ह्यातील ५९ शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली असून २५ टक्के ६९२ आरक्षित जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हापासून ११३१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची आॅनलाईन पद्धतीने लॉटरी काढून प्रथम फेरी १ किमी अंतरावरील शाळांसाठी झाली. यात एकूण २४५ विद्यार्थ्यांची आॅनलाईन पद्धतीने निवड झाली. त्यापैकी १५० विद्यार्थ्यांचे पात्र शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी जे पालक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करू शकले नाहीत, त्यांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पालकांनी पाल्यांचे आॅनलाईन अर्ज भरताना शासनाने दिलेल्या अटींचे पालन करावे, तसेच रहिवासी पुरव्यानुसार गूगल मॅपमध्ये आॅनलाईन लोकेशन योग्यप्रकारे मॅप करावे. शिवाय भरलेल्या माहितीची खात्री करून घ्यावी. प्रवेश निश्चित करताना शाळेत सर्व मूळ प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार सादर करावीत.आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेश दिला जात नाही, याबाबत शिक्षण विभागाकडे ७ पालकांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारींचे दखल घेत या पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या.१७ मे २०१८ नुसार वंचित गटामध्ये वि.जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष प्रवर्ग (एसबीसी) या संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एससी, एस.टी. संवर्गाप्रमाणेच वरील संवर्गातील बालकांच्या पालकांना उत्पन्नाच्या मर्यादेची अट लागू नाही. परंतु जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच एचआयव्ही बाधीत व प्रभावित बालकांच्या पालकांनाही उत्पन्नाची अट लागू नाही. परंतु त्यांच्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम अधिकाºयांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइन