लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या शिक्षण समितीतून स्वारातीम विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी जि.प. सदस्या रुपाली पोटील गोरेगावकर यांना नामनिर्देशित करण्याचा ठराव आज शिक्षण समितीत झाला.शिक्षण सभापती संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यात जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण याही इच्छुक होत्या. मात्र संख्याबळ गोरेगावकर यांच्या बाजूने गेल्याने त्यांना नामनिर्देशित करण्यात आले. निवडीनंतर त्यांचा जि.प. सदस्या संगीता शिंदे, विठ्ठल चौतमल, रामरतन शिंदे, गणाजी बेले, राम कदम, पोहकर, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, डी.के.इंगोले आदींच्या उपस्थितीत सत्कारही करण्यात आला. यावेळी बैठकीतील इतर विषय मात्र चर्चेसाठी पुढील सभेत ठेवण्याचे ठरले. या निवडीला निवडणुकीचे स्वरुप आले होते.
विद्यापीठ अधिसभेवर रुपाली पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:44 AM