लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील कन्हेरगाव नाका येथील ग्रामविकास अधिकारी आर.एन. घोगरे यास वारंवार सूचना दिल्यानंतरही दप्तर हस्तांतरण करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास अटक करण्याचा आदेश दिला होता. शुक्रवारी या ग्रामविकास अधिकाºयास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासमोर कन्हेरगाव नाका येथील प्रकरण सुनावणीस आहे. मात्र यातील दस्तावेज मिळत नसल्याने सुनावणीत अडचणी येत आहेत. यात जुन्या ग्रामविकास अधिकाºयाने नव्याने पदभार घेतलेल्याकडे काही दस्तावेज सुपूर्द केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या ग्रामविकास अधिकाºयाने दस्तावेज नव्या ग्रामविकास अधिकाºयास द्यावेत, असा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला होता. मात्र महिनाभरापासून यात दिरंगाई होत असल्याने जिल्हाधिकारी भंडारी यांनी संबंधितास अटक करण्याबाबतचे पत्र पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधितास ताब्यात घेतले आहे. त्याच्या जामीनासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. याबाबत स्थागुशाचे पोलीस निरीक्षक मारुती थोरात म्हणाले, संबंधितास अटक करून परभणीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना विचारले असता ते म्हणाले, संबंधित ग्रामविकास अधिकाºयास यापूर्वी दोनदा संधी दिली. मात्र त्यांनी नवीन ग्राम विकास अधिकाºयाकडे दस्तावेज हस्तांतरण केले नाही. कन्हेरगाव येथील सरपंचांच्या अविश्वास प्रकरणासह अतिक्रमणाच्या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. मात्र त्यासाठी नवीन ग्रामविकास अधिकारी दप्तर उपलब्ध करून देवू शकत नाहीत. त्यामुळे वारंवार या कामकाजात व्यत्यय येत असल्याने हा आदेश दिला होता. आता दस्तावेज दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र सीईओंचा तसा अहवाल आवश्यक आहे.
ग्रामविकास अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:10 AM