लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढाऱ्यांची विविध कार्यालयांतील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्हा परिषद, नगरपालिका अशा राजकीय गप्पांचा आखाडा रंगविणाºया ठिकाणीही पुढारी चुकूनच आला तर पहायला मिळत आहे.यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तरीही कोणत्याच पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही. तसा वंचित आघाडीने उमेदवार दिला. मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वांनाच झुलवत ठेवले आहे. निष्ठावंत, स्थानिक, परके अशा वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत आहे. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरीही त्यांनी स्वत: अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. मतदारसंघात यापूर्वी कमालीचे सक्रिय राहणारे सातव आता गुजराथच्या नियोजनातच जास्त वेळ घालवत आहेत. तर दुसरीकडे ते उभे राहिले नाही तर काँग्रेसकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा होत आहे. शिवसेनेत तर कधीच एका नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे मातोश्रीवर वारंवार बैठका होत आहेत. अजूनही या पक्षाचा उमेदवार कोण? हे निश्चित नाही. मागच्या वेळी पराभूत झालेला उमेदवार नव्हे, तर नवा चेहरा देण्याची तयारी सुरू असल्याने सेनेला उमेदवारी वेळेत जाहीर करावी लागणार आहे. अपुºया तयारीवर लढा देणार तरी कसा, हा प्रश्न आहे.या सर्व प्रकाराच्या चर्चा मिनी मंत्रालय, नगरपालिकेत हमखास घडायचा. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर पुढाऱ्यांनी मंजुरी मिळालेल्या विकास कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या कार्यालयांकडे कोणी फारसे फिरकताना दिसत नाही. गर्दीने गजबजून जाणाºया पदाधिकाºयांच्या दालनातही आता रिकाम्या खुर्च्याच पहायला मिळत आहेत. अधिकारी यामुळे निश्चिंत झाले आहेत.
विविध कार्यालयांतील पुढाऱ्यांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:11 AM