या टीममध्ये निवडक १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या १४ कर्मचाऱ्यांवर स्वच्छतेच्या कामांकडे लक्ष देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच्या ३६ कामांपैकी २० कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील सिद्धार्थनगर, अंबिका टॉकीज परिसर, मोसीकॉल परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, औंढा रोड परिसर, पेन्शनपुरा, नाईकनगर, हरण चौक, गांधी चौक, महावीर चौक, रिसाला परिसर, गाडीपुरा परिसर आदी छोट्या-मोठ्या नगरांमधील नाल्यांची तसेच इतर स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. आजमितीस स्वच्छता विभागाकडे जवळपास दीडशे कर्मचारी कार्यरत आहेत. काही कर्मचारी शहरातील रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा उचलून कचराकुंडीत नेऊन टाकत आहेत.
१४ कर्मचाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वच्छतेची कामे चांगली व्हावीत, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी १४ निवडक कर्मचाऱ्यांची टास्कफोर्स टीम तयार करण्यात आली आहे. हे कर्मचारी शहरातील नगरांमध्ये फिरून स्वच्छतेची कामे करीत आहेत.
- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, न. प.