शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भाजी (महाप्रसादाचे) मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. ही भाजी यावर्षी जवळपास १५० ते २०० क्विंटलची एकत्रित करतात. व ही भाजी खाल्यास रोगराई व इतर आजार नाहिशे होतात, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. भाजी महाप्रसाद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील विरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.१६ जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी गुरूवर्य व भाविक तसेच वसमत, हयातनगर, फुलकळस, सावळी, पूर्णा, वस्सा, साडेगाव व परिसरातील नागरिक पदयात्रा घेऊन दाखल झाले आहे. उपस्थितांची जेवणाची व्यवस्था महादेव बिचेवार यांनी केली आहे. परभणी व वसमत आगाराच्या वतीने बसची व्यवस्था केली आहे. तसेच यात्रेत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजी महाप्रसाद घेण्यासाठी यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे... ते तिघे स्थानबद्धसारंग स्वामी यात्रेमध्ये आज भाजीचा महाप्रसाद वाटप व यात्रेसाठी शांतता समितीची बैठक उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घेतली. यात सारंग स्वामी येथील तीनही महाराजांना पावबंद करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आल्याने आता मात्र तीनही महाराजांना स्थानबद्ध राहावे लागणार आहे. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात केला. तर एसआरपीच्या तुकडीसुद्धा यात्रेमध्ये दाखल होणार आहे.
सारंगस्वामींचा ‘भाजी प्रसाद’ आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:26 AM
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
ठळक मुद्देअनेक ठिकाणच्या पालख्या दाखल भाविकांमध्ये मोठा उत्साह