सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:41 PM2019-01-15T23:41:59+5:302019-01-15T23:50:57+5:30

हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.

 Satav was elected as the fourth President of the Parliament | सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने २००९ पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.सातवांनी ८१ टक्के उपस्थिती लावत ११७ वेळा चर्चेची सुरुवात, ८८ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकित व अतारांकित असे १०७५ प्रश्न उपस्थित करुन २३ खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा. सातव यांची निवड झाली आहे. या समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. तामिळनाडू येथे राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी पारितोषक वितरण सोहळ्यास राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, राज्यमंत्री पी.पी चौधरी, डॉ.भास्कर राममूर्ती, अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
देशात सातव दुसऱ्या क्रमांकावर
लोकसभेतील ५४३ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलू कामगिरीवरून दुसºया क्रमांकावर असून, सातव यांना १२१५ अंक मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर १२७२ अंक मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसºया क्रमांकावर १२११ अंक मिळवून शिवसेनेचे खा.श्रीरंगअप्पा बारणे आहेत.

Web Title:  Satav was elected as the fourth President of the Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.