सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:09 AM2018-12-17T00:09:39+5:302018-12-17T00:09:57+5:30
संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आता १००३ वर पोहोचली आहे.
मागील साडेचार वर्षांत १ जून २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत संसदेत अव्वल खासदारांमध्ये स्थान मिळविण्याचा बहुमान हिंगोलीकरांसह महाराष्ट्राला मिळाला आहे. खा.राजीव सातव यांनी लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. यानंतर लोकसभेतील २३ उच्चपदस्थांचा समावेश असलेली पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था राज्यसभा, लोकसभेतील खासदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात खा. राजीव सातव यांचा लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या सहा खासदारांत त्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ११ खासदार निवडून दिले.
सर्वाधिक प्रश्न विचारून लोकसभेत हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत मतदारसंघासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील १००० पेक्षा अधिक प्रश्नांवर आक्रमकपणे आपली बाजू मांडून विरोधी पक्षांतील सरस खासदार असा ठसा खा. राजीव सातव यांनी कार्यकर्तुत्वाचा उमटविला आहे. लोकसभेत मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासह राज्यस्तरीय, राष्ट्रीय प्रश्नांवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया खासदारांत महाराष्ट्राचाच बोलबाला असून ५४५ खासदारांपैकी पीआरएसने १ जुन २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत कामगिरीच्या लेखाजोख्यात लोकसभेतील अव्वल खासदारांत शिवाजी आढळराव पाटील १०८२, खा. सुप्रिया सुळे १०६३, खा.धनंजय महाडीक १०५५, खा.विजयसिंह मोहिते पाटील १०२४, खा.श्रीरंगअप्पा बारणे १०११, खा.राजीव सातव १००३ यांचा समावेश आहे.