सरस्वती विद्या मंदिरात जयंती साजरी
हिंगोली : येथील सरस्वती विद्या मंदिर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका ज्योतिका मोरे, देशमुख, चोंढेकर, वाकळे, भोसले, भुरके, राठोड, मुसळे, पवार व गेजलवार उपस्थित हाेते. फाेटाे नं. ०८
जिल्हा परिषद शाळा आनंदनगर येथे जयंती साजरी
बासंबा : हिंगाेली शहरातील अकाेला बायपास परिसरातील जिल्हा परिषद आनंदनगर शाळेत तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन संस्था बार्टी येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संगीता खांदळे, सुनीता आवटे, बालाजी कटारे, वामन इंगाेले, ज्याेती चटप, वर्षा संदीप जाधव, इमरान शेख, जान्हवी शेख यांची उपस्थिती हाेती.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सवड : हिंगोली तालुक्यातील सवड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष चंद्रहास कावरखे, मुख्याध्यापक सी. सी. खिल्लारी, शिक्षिका पुष्पा अग्रवाल, अर्चना शिंदे, ए. एस. सिद्दिकी, राहुल दांडेकर, शेख जाकीरा, बांगर, उज्ज्वला पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. फाेटाे नं. १०