लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने सन २०१८-१९ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ आश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहेत.त्याअनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांनी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचतगट असावा, बचतगटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे, गटामध्ये किमान १० किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावे व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांचे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे व ते आधार क्रमांकासी संलग्न असणे गरजचे आहेत. संबंधित गटाने, गटातील सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. निवडीनंतर गटाला १० टक्के रकमेचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागणार आहे. अर्ज उद्दिष्टापेक्षा जास्त पात्र ठरल्यास गटाची निवड ही लक्की ड्रॉ पध्दतीने करण्यात येणार आहे. अटी व शर्ती पूर्ण करणाºया बचत गटांनी तसेच यापूर्वी अर्ज सादर केले परंतु लाभ न मिळालेल्या बचत गटांनी नव्याने अर्ज सादर करण्याचे आवाहन स. आयुक्त समाज कल्याणतर्फे करण्यात आले. १३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज पाठवावेत.
अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:31 AM