लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविली जात आहे. मात्र सदर प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. वारंवार इंटरनेटद्वारे होणाऱ्या खोड्यामुळे आॅफलाईनद्वारेच अर्ज प्रक्रिया सुरू आहे.महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागाकडूनू संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून खबदारी घेण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात मात्र सदरची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जि. प. समाजकल्याणच्या शिष्यवृत्ती विभागाकडे माहिती विचारली असता, विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आले असून सदर माहिती एकत्रित केली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जि. प. समाजकल्याण विभागाकडे विविध योजनेअंतर्गत दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीसाठी किती अर्ज आले आहेत, याबाबत मात्र आकडेवारी उपलब्ध नाही.शासनाकडून यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. परंतु पोर्टलमधील वारंवार बिघाडामुळे आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. आॅफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांची माहिती भरताना वारंवार होणारा इंटरनेटमधील खोड्यामुळे एखादा विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकही पात्र विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत आॅफलाईन पद्धतीने माहिती स्वीकारली जात आहे. २०१८-१९ या वर्षातील शिष्यवृत्ती करीता पात्र विद्यार्थ्यांचे आॅफलाईन पद्धतीने माहिती भरताना मुख्याध्यापकांना अडचणी येऊ नयेत. यासाठीकार्यशाळांचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शनही केले होते.जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दरवर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शासनाकडून विविध योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षांतील पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार असून अर्ज पडताळणीची कामे सुरू आहेत.
शिष्यवृत्तीची कामे संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:12 AM