लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव: तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाच्या मागणीकरिता २९ नोव्हेंबरला ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून चार दिवसानंतरही या प्रकाराची शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. शाळेचे कुलूप कायम असून शिक्षकांची रिक्त पदे भरल्याशिवाय शाळेचे कुलूप काढणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.तालुक्यातील ब्रह्मवाडी हे अतिदुर्गम भागातील गाव असून या ठिकाणी जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या आठ वर्गाकरिता शिक्षकांची १० पदे मंजूर असताना शाळेत केवळ सहा शिक्षक कार्यरत आहेत. कार्यरत असणाºया सहा शिक्षकांपैकी एका शिक्षकाची दुसºया शाळेवर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तर एक शिक्षिका प्रसूती रजेवर आहेत. एक शिक्षक बीएलओ म्हणून निवडणुकीचे काम पाहत असल्याने शाळेचा संपूर्ण भार तीन शिक्षकावरच आला आहे. अशा परिस्थितीत कार्यरत असणारे तीन अंशकालीन शिक्षकही कमी करण्यात आल्याने शाळेत अध्यापनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. आठ वर्गाकरिता केवळ तीनच शिक्षक हजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारासंबंधी ग्रामस्थांच्या वतीने वारंवार पंचायत समिती शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले. परंतु त्याची कोणतही दखल शिक्षण विभागाने घेतली नसल्याने ग्रामस्थांनी २९ नोव्हेंबरला शाळेला कुलूप ठोकून शिक्षक द्या, अन्यथा कुलूप उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. शनिवारपर्यंत शाळेचे कुलूप कायम होते. तातडीने शिक्षक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच छत्रपती गडदे, विलास गडदे, गौतम ठोके, दत्तराव गडदे, यादव गडदे, शिवराज गडदे, बंडू गडदे आदींसह पालकांनी केली आहे.
शाळेला चार दिवसांपासून कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:37 PM
तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाच्या मागणीकरिता २९ नोव्हेंबरला ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून चार दिवसानंतरही या प्रकाराची शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. शाळेचे कुलूप कायम असून शिक्षकांची रिक्त पदे भरल्याशिवाय शाळेचे कुलूप काढणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
ठळक मुद्देब्रह्मवाडी : शिक्षकाच्या मागणीकरिता ग्रामस्थ आक्रमक