लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : प्रभाग क्रमांक १६ मधील डस्टबीन वाटप का केले नाही, या कारणावरून मुख्याधिकारी शैलेस फडसे यांच्याशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव येथील नगर पंचायात कार्यालयात चौघांनी संगनमत करून डस्टबीन वाटपाच्या कारणावरून मुख्याधिकारी शैलेस फडसे यांच्यासोबत वाद घातला. कार्यालयात येऊन आरोपींनी एकच गोंधळ घातल्याने फडसे यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी फडसे यांच्या अंगावर आरोपी धावून गेले. अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. कार्यालयात घातलेल्या या गोंधळामुळे मात्र प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला. याप्रकरणी बबन गणपत सुतार, नगरसेविका अनुराधा विजय सुतार, विजय गणपत सुतार, ज्ञानेश्वर कांबळे या चौघांविरूद्ध सेनगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन-मुख्याधिकारी अपमानास्पद वागणूक देत असून कार्यालयात मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार नगरसेविका अनुराधा सुतार यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. याबाबत चौकशी करून कारवाईची मागणीही करण्यात आली. निवेदनावर अनुराधा सुतार, संदीप बहिरे, गयाबाई खंदारे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:34 AM