लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.